चौफेर न्यूज – 26 जानेवारी 2021 रोजी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सैनिक श्री.प्रवीण देसले (कासारे) यांच्या हस्ते प्रथम भारत मातेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅम व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे सर,श्री.तुषार देवरे सर शिक्षकवर्ग व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.राष्ट्रगीत व झेंडा गीत शाळेच्या शिक्षकांनी सादर केले.याप्रसंगी शाळेचे संस्थापक श्री.प्रशांत भीमराव पाटील सर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.तसेच श्री.संदीप देवरे सरांनी प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो.याची माहिती विशद केली व सौ.नीतू पंजाबी मॅडम यांनी 26 जानेवारी 1950 पासून संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरू झाला असे मनोगत व्यक्त केले.तर शाळेच्या प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅम यांनी संविधान तयार करण्यास कोण कोणत्या नेत्यांनी सहकार्य केले याविषयी माहिती विशद केली.इ.नववीच्या सुलीका यादव व भूमिका पाटील यांनी संविधान मानवास मूलभूत हक्क व कर्तव्य यांची जाणिव करुन देता येते अशी माहिती विशद केली.तसेच श्वेता सोनवणे मॅम यांनी मेरा मुल्क मेरा देश हे देशभक्तीपर गीत गायले.
या कार्यक्रमाचे संयोजन श्री.रावसाहेब साळवे सर व सूत्रसंचालन श्री.मोहन गावित सर यांनी केले.फलक लेखन व सजावट सुनीता मॅडम व प्रीती लाडे मॅडम यांनी केले.तसेच सुंदर रांगोळी वृषाली मॅडम व वैष्णवी थोरात मॅडम यांनी काढली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वर्गाने व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.