चौफेर न्यूज – आज दिनांक 18/02/202। रोजी प्रचिती पब्लिक स्कुल येथे शिव जयंती साजरी करण्यात आली. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेचे समन्वयक श्री राहुल पाटील सर उपस्थित होते. सरस्वती पुजन व शिवाजी महाराजा च्या प्रतिमाच्या पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली
सहयातीच्या छाताडातून नाद भवानी गाजे काळजात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे ।।
तुफान गर्जतो, आग ओकतो
वाघ मराठी माझा।
सन्मान राखतो जान झोकतो
तुफान मातीचा राजा
आजच्या कार्यक्रमात श्री राहुल पाटील सर यांनी आपल्या भाषणातुन शिवाजी महाराजांन बद्दल मनोगत व्यक्त केले
दुखामध्ये डोव्यातुन धार आणु नका…..
संकुचित जायाला सार मानु नका. . ..
जीवनाला कधी भार मानु नका
अशा या संकल्पनेतुन जग कोरोना मुक्त व्हावे अशी प्रार्थना करून विदयार्थ्यांनी लवकरात लवकर शालेत यावे असे मनोगत व्यक्त केले, तसेच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.