चौफेर न्यूज – ‘डिस्कवरी स्कूल सुपर लीग’ आणि ‘बायजूस’ आयोजित तसेच ‘लोकमत वृत्तपत्र समूह’ संयोजित तिसऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री येथील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यात इयत्ता चौथीतील हितेश मनोज देसले इयत्ता सातवीतील सम्यक राजेंद्र कांकरिया आणि इयत्ता दहावीतील शुभदा अरुण बच्छाव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील सर प्राचार्या श्रीमती. वैशाली लाडे, श्रीमती. भारती पंजाबी तसेच संस्थेचे समन्वयक श्री. वैभव सोनवणे, श्री. तुषार देवरे, श्री. राहुल अहिरे त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. शाळेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा जिंकण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.