चौफेर न्यूज – केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचवेळी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे, तो म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांना Internal assement नुसार गुण देऊन पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. पण विद्यार्थी त्या बद्दल असमाधानी असेल, तर तो पुढच्या वेळी परीक्षेस बसून अंतिम गुण मिळवू शकतो. कोविड महामारी संपुष्टात आली किंवा आटोक्यात आली की दहावीच्या परीक्षाही होऊ शकतात. त्यावेळी विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला. दहावीच्या परीक्षांचा निकाल हा सीबीएससी बोर्डाने तयार केलेल्या ऑब्जेटिव्ह निकषांनुसार लावण्यात येईल आणि योग्य वेळी तो जाहीर करण्यात येईल.

बारावीची परीक्षा पुढे ढकलली असून तिची पुढील तारखा कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर जाहीर करण्यात येईल, असेही शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here