चौफेर न्यूज – देशातील कोरोना परिस्थितीचा विचार करून चार्टर्ड अकाऊंटंटची (सीए) अंतिम परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटकडून (आयसीएआय) मंगळवारी देण्यात आली. ‘सीए’ची अंतिम आणि इंटरमिडिएट परीक्षा येत्या 21 आणि 22 मे रोजी घेण्यात येणार होती. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून ती पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात येईल आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल असे आयसीएआयने कळवले आहे.