चौफेर न्यूज – पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये 5 हजार कोविड बेड उपलब्ध असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे लष्कराच्या जनसंपर्क विभागाने म्हंटले आहे.

पुण्यात कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. त्याच वेगाने सोशल मीडियावर फेक मेसेज देखील पसरत आहेत. कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय हे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड केले जात आहेत. असाच एक मेसेज पुण्यातील कमांड हॉस्पिटलबाबत व्हायरल होत आहे. यामध्ये कमांड हॉस्पिटलमध्ये 5000 कोविड बेड उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. दरम्यान हा मेसेज खोटा असल्याचे लष्कराच्या जनसंपर्क विभागाने म्हंटले आहे.

सोशल मीडिया द्वारे पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल सावध रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here