चौफेर न्यूज – कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या आपल्या पाल्याची फी कशी व कुठून भरावी, असा यक्षप्रश्न आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनने अनेकांच्या रोजगारावर गदा आणली आहे. अनेक जण वर्क फ्रॉम होम करत असले तरी पगार अर्धा येत असल्याने महिन्याचे घरखर्च व इतर खर्च भागवताना प्रत्येकाची पंचाईत होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,उच्च तंत्र शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे ई-मेल द्वारे पत्र पाठवून केली मागणी

मुंबई : शालेय शिक्षण विभागाच्या अख्यत्यारितील कनिष्ठ महाविद्यालये तसेच राज्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील फी ५० टक्के कमी करावी. सर्वोच्च न्यायालयाने देशातील कोरोना आणीबाणीच्या परिस्थितीचा विचार करून शालेय शुल्क (फी) १५ टक्के कमी करण्याचा निर्णय दिला आहे. आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने याआधीच राज्यातील शाळांची फक्त फी १५ नव्हे तर ५० टक्के कमी करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. आता याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागातंर्गत चालवणारी जाणारी कनिष्ठ महाविद्यालये तसेच उच्चतंत्र शिक्षण विभागाच्या अख्त्यारितील महाविद्यालयांची फी देखील ५० टक्के कमी करावी, अशी आमची मागणी आहे.

कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या आपल्या पाल्याची फी कशी व कुठून भरावी, असा यक्षप्रश्न आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनने अनेकांच्या रोजगारावर गदा आणली आहे. अनेक जण वर्क फ्रॉम होम करत असले तरी पगार अर्धा येत असल्याने महिन्याचे घरखर्च व इतर खर्च भागवताना प्रत्येकाची पंचाईत होत आहे.

शाळा, महाविद्यालये बंद असल्याने कोरोना महामारीत आभासी (ऑनलाइन) शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून फी वसुली सुरू आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे. महाविद्यालयांची फी देखील ५० टक्के कमी करून राज्य सरकार कोरोना परिस्थितीत गांजून गेलेल्या जनतेला नक्कीच दिलासा देईल, अशी आम्हाला संपूर्ण खात्री आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here