चौफेर न्यूज – केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शालेय आधारित मूल्यांकनामध्ये काही बदल केले आहेत. काही शाळा कोरोना (Corona) महामारीमुळे प्रॅक्टिकल (Practical Exam) किंवा अंतर्गत मूल्यांकन (Internal evaluation) परीक्षा घेऊ शकले नाहीत. हे लक्षात घेऊन बोर्डाने (CBSE) शाळांना ऑनलाइन परीक्षा (Online exam) घेण्यास आणि त्यांचे गुण अपलोड करण्यास 28 जून पर्यंतची मुदत दिली आहे.
CBSE बोर्डाने ज्या विषयांच्या अंतर्गत परीक्षा घेण्यात येणार आहेत, अशा विषयांची यादी जाहीर केली आहे. लेखी आणि प्रॅक्टिकल गुणांचे विभाजन, प्रकल्पाची वेळ आणि परीक्षांचा कालावधी यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
सीबीएसईने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ज्या विषयांसाठी बाह्य परीक्षकांची नेमणूक केली गेली नाही, त्या विषयांसाठी संबंधित शाळेतील शिक्षक ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करतील आणि बोर्डाने दिलेल्या लिंकवर गुण अपलोड करतील.
प्रॅक्टिकल परीक्षा किंवा प्रोजेक्टचे मूल्यांकन करण्यासाठी बाह्य परीक्षकाची नेमणूक केली जाते.
यंदा बाह्य परीक्षक आणि अंतर्गत परीक्षक एकमेकांशी चर्चा करुन प्रोजेक्टसाठीची तारीख निश्चित करतील,
तसेच विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. 2021 या वर्षी बारावीच्या परीक्षांबाबत नोंदणीकृत उमेदवारांसाठीचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.





















