चौफेर न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी दहावी बारावीच्या परीक्षा Exam रद्द करण्यात आल्या आहेत मूल्यमापन गुणांवर या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात येणार आहे. त्यामुळे आत्ता हा निकाल कशी लागणार आणि पुढील शैक्षणिक वर्ष Academic year कधी सुरु होणार यावर सध्या चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, प्रवेशापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून जुलै अखेर बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा घेऊन, १५ ऑगस्टपर्यंत निकाल आणि १ सप्टेंबरपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष Academic year सुरू करण्याचे नियोजन असल्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

तसेच बीए, बीकॉम, बीएससी अशा विनाव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

त्यामुळे बारावीचा निकाल आल्यानंतर कुलगुरूंशी चर्चा करून पुढील प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

उदय सामंत म्हणाले की, सीमा भागातील मराठी जनतेला मराठीतून शिक्षण मिळावे यासाठी शिवाजी

विद्यापीठाच्या प्रयत्नातून महाराष्ट्राच्या हद्दीत कौशल्यपूर्ण पाच अभ्यासक्रम सुरू करीत आहोत.

यासाठी स्वतःच्या जागेत शैक्षणिक संकुल निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे लवकरच

याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी यापूर्वीही ५० लाख ते एक कोटी पर्यंतचा निधी देण्याची घोषणा केली होती मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी तीन कोटी देण्याचा निर्णय घेतला असून अध्यादेशही काढण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here