चौफेर न्यूज –  इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 20 जुलैला जाहीर करणार असल्याची घोषणा केंद्रीय परीक्षा मंडळाने (सीबीएससी) केली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल 31 जुलै रोजी लागणार आहे. आजच सीबीएससीने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचे सूत्र जाहीर केले आहे. या सूत्रानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

याबद्दल बोलताना सीबीएससी मंडळाचे संयम भारद्वाज म्हणाले, की दहावीचा निकाल 20 जुलैला आणि बारावीचा निकाल 31 जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेणेकरुन ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी जायचे आहे, त्यांना काही अडचणी यायला नकोत. सीबीएससीने आजच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. 40: 30: 30 या फॉर्म्युल्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. मूल्यमापनाच्या या पद्धतीनुसार, यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर 30 टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर 30 टक्के गुण असतील ते 11 वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले 40 टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि पूर्व परीक्षेच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here