चौफेर न्यूज – यश हे अपघाताने मिळत नाही, तर यश ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.यश साधनेने, अथक प्रयत्नांनी आणि श्रद्धेने मिळत असते.

दिवसरात्र अभ्यास करून केलेली डॉक्टरी विद्या फक्त व्यवसायापुरती मर्यादित न राहता, त्याचा उपयोग इतरांना कसा होईल, यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर म्हणजे डॉ. अरविंद खरात. महाराष्ट्रातील पॅरामेडिकल अर्थात सहवैद्यकीय क्षेत्र आणि डॉ. अरविंद पंडित खरात हे नाव म्हणजे जणू एक समीकरणच झाले आहे. सहवैद्यकीय क्षेत्रामध्ये उज्ज्वल करिअर करून देण्यासाठी त्यांनी एक प्रवेशद्वारच उघडले आहे.सहवैद्यकीय क्षेत्रातील करिअरसाठी सर्टिफिकेट, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, डिग्री या अभ्यासक्रमांद्वारे सुवर्णसंधी डॉ. खरात यांनी उपलब्ध करून दिली आहे. डॉ. खरात हे देशांतर्गत कार्यरत असलेल्या कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्रात गेल्या १८ वर्षांपासून कार्यरत आहेत. सध्या ते पिंपरी-चिंचवड पॅरामेडिकल फाउंडेशन व पुणे पॅरामेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवित आहेत.

त्यांनी २००१ मध्ये राज्यातील अग्रगण्य स्थानी असणाऱ्या मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. सीएमएलटी, डीएमएलटी, पीजीडीएमएलटी, डीओटीटी, डीएमआरटी, तसेच नर्सिंग यांसारखे अभ्यासक्रम शिकविले जातात. या अभ्यासक्रमांद्वारे करिअरचा एक उत्तम मार्ग त्यांनी दाखवून दिला आहे. डॉ. खरात यांनी यश मिळविण्यासाठी फक्त मार्गच नाही दाखविला तर, शिक्षणानंतर शंभर टक्के रोजगाराची हमी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे ती पूर्ण केली. या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी फक्त महाराष्ट्रातच किंवा भारतातच नव्हे तर, भारताबाहेरदेखील उत्तम प्रकारे आपले कार्य करीत आहेत. डॉ. खरात सांगतात की, लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. हीच शिक्षणाची आवड जिद्द बनून गेली. जिद्द काहीतरी करून दाखविण्याची, जिद्द गोरगरिबांना शिकविण्याची आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची, मात्र ही जिद्द पूर्ण करण्याचा प्रवास साधासोपा नव्हता. असंख्य अडचणींना तोंड देत, त्यांच्यावर मात करत ते मार्गक्रमण करत राहिलो. त्यांच्या यशाच्या कीर्तीचा सुगंध फक्त भारतातच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवळत आहे.

आतापर्यंत फक्त त्यांच्या शिक्षण संस्थेपुरतेच कार्य न करता मनामध्ये सामाजिक भावना ठेवत सगळ्यांसाठी अखंड आणि निरंतर कार्य सुरू ठेवले आहे. आणि त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना पिंपरी-चिंचवड आयकॉन, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, अवॉर्ड फॉर बेस्ट सेक्टर स्किल कौन्सिल यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.खरात यांची मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील एकमेव शिक्षणसंस्था आहे, त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘आयएओ’कडून प्रमाणित केले आहे. दरवर्षी जवळपास २५० विद्यार्थी या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडतात. या संस्थेचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे, या संस्थेची असलेली शंभर टक्के यशाची पंरपरा. डॉ. खरात यांच्या या ज्ञानदान कार्याचे जाळे महाराष्ट्रात पसरवले आहे.आपल्या जवळचे ज्ञान मुलांना वाटले पाहिजे या उद्देशाने ते संस्थेमध्ये पॅथॉलॉजी हा विषय स्वतः शिकवितात.

– डॉ. अरविंद खरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here