चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज दि.21 जून 2021 वार सोमवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या सौ.भारती पंजाबी मॅम, प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅम व व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर व श्री.तुषार देवरे सर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. योग दिनाचे महत्व आणि माहिती सौं नीतू पंजाबी मॅम यांनी सादर केले.याप्रसंगी शाळेतील क्रीडा शिक्षक श्री नितीन राजपूत सर तसेच शिक्षकवृंद यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, पद्मासन, अर्धकोनासन, त्रिकोणासन इत्यादी आसनांचे प्रात्यक्षिके सादर केले. तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व बौद्धिक क्षमता वाढावी याबद्दल माहिती देऊन *स्वस्थ रहा, सुरक्षित रहा*असा संदेश दिला. सौं स्मिता नेरकर मॅम यांनी योग दिनानिमित्त विविध घोषणा दिल्या.या कार्यक्रमाचे संयोजन श्री. जयेश शर्मा सर यांनी केले. सूत्रसंचालन सौ.सपना देवरे मॅम यांनी केले. फलक लेखन सौ सुनिता पाटील व जागृती जाधव मॅम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.