चौफेर न्यूज – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच दहावीचा निकाल जाहीर करू शकते. तथापि, निकालाच्या तारखेसंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार अनेक शाळांनी अद्याप दहावीच्या गुणांची सुधारीत शीट सीबीएसईला पाठविली नाही. यासंदर्भात सीबीएसईने एक आदेश पाठवत शाळांना इशारा दिला आहे की, 22 जुलैपर्यंत 12 वीचा निकालपत्रक अपलोड न केल्यास त्या शाळांचा निकाल जाहीर होणार नाही. यंदाचा निकाल विशेष असणार आहे कारण या वेळी विद्यार्थ्यांचा निकाल मूल्यांकन धोरणांतर्गत तयार करण्यात आला आहे. यावर्षी सीबीएसईसह विविध राज्य मंडळांना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. CBSE Class 10 Result 2021 चा निकाल पाहण्यासाठी या स्टेप्सचे अनुसरण करा

स्टेप्स 1 : सर्व प्रथम, सीबीएसई अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जा.

स्टेप्स 2 : वेबसाईटवर दिलेल्या सीबीएसई 10 वीच्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप्स 3 : त्यानंतर, आपल्याला आपला रोल नंबर आणि जन्मतारीख सबमिट करावी लागेल.

स्टेप्स 4 : आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल.

स्टेप्स 5 : आता आपण आपला निकाल तपासण्यास सक्षम असाल.

गुणवत्ता यादी नाही

वेगळ्या गुणांकन योजनेच्या आधारे निकाल तयार होत असल्याने यावर्षी सीबीएसई गुणवत्ता यादी जाहीर न करण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय असो, निकाल लागल्यावर बोर्ड त्यास पुष्टी देईल.

दहावीचा निकाल कसा तयार होईल?

निकालासाठी 20 + 80 चे सूत्र तयार केले गेले आहे. प्रत्येक विषयात जास्तीत जास्त 100 गुणांचे मूल्यांकन केले जाईल, त्यापैकी 20 गुण पूर्वीच्या आतील मूल्यांकन असतील. याशिवाय उर्वरित 80 गुण नव्या पॉलिसीच्या आधारे दिले जातील. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या 80 गुणांची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी 10 गुण वेळोवेळी घेण्यात आलेले युनिट परीक्षेचे आहेत, 30 मध्यावधी परीक्षेसाठी आणि 20 प्रीबोर्ड परीक्षेसाठी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here