चौफेर न्यूज – विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील मान्यताप्राप्त सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांना अथवा प्रतिनिधींना मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या मूळ गुणपत्रिका व इतर साहित्यशनिवार (दि.७) पासून वितरित करण्यात येणार आहे.
त्यासाठी नाशिक विभागातील चारही जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असून, संबंधित शाळांना सोमवार दुपारी ३ वाजेपर्यंत गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर, शाळांनी सोमवारी (दि.१०) दुपारी ३ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून, गुणपत्रिकांचे वितरण करण्याच्या सूचना नाशिक विभागीय शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत.
दरम्यान, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, निफाड, पेठ,सुरगाणा, नाशिक ग्रामीण, सिन्नर, त्र्यंबकेश्वर व नाशिक शहर भागातील वाटप केंद्रासाठी शनिवारी (दि.७) वितरणाचे नियोजन आहे.
वाटपाचे नियोजन .७ऑगस्ट-दिडोरी, इगतपुरी. कळवण, निफाड, पेठ, सुरगाणा ( नाशिक विभागीय मंडळ-आ नाशिक ग्रामीण, सिन्नर, त्र्यंबकेश्वर
नाशिक शहर (नाशिक विभागीय मंडळ –ब) .९ऑगस्ट–देवळा, मालेगाव ग्रामीण, सटाणा, मालेगाव शहर, (या. ना. जाधव हायस्कूल मालेगाव) नांदगाय, येवला (संत वाणवा हायस्कूल मनमाड)





















