चौफेर न्यूज – येत्या २० ऑक्टोबरपासून ५० टक्के आसन क्षमतेने स्थानिक प्राधिकारच्या आणि विद्यापिठाच्या सहमतीने मुंबईतील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने आपल्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना सुरू करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहेत. महाविद्यालय सुरू होणार असली तरी वसतिगृह सुरु होणार का याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे.

१८ वर्षांवरील विद्यार्थी दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच परवानगी देण्यात येणार असून महाविद्यालय सुरू करताना कोरोना प्रादुर्भाव रूग्ण संख्या याचा आढावा स्थानिक प्रशासन, महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याशी संयुक्त विचारविनिमय करून घेता येईल. दरम्यान, कोरोना व्यवस्थापनाचे राज्य सरकारने आणि आयसीएम आर मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करत महाविद्यालय सॅनिटाइझ करणे, महाविद्यालय परिसरात स्वच्छता राखणे, सुरक्षित अंतर तसेच मास्क या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असेही या मार्ग्दर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात येणे शक्य नसेल त्यांना ॲानलाइनचा पर्याय खुला असणार आहे. वसतिगृह सुरू करण्याबाबत निर्णय टप्प्याटप्प्याने आढावा बैठक घेऊन घेतला जाईल. लसीकरण पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here