चौफेर न्यूज – बालेवाडी येथील श्रध्देय पब्लीक स्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये (सीबीएसई पेंटर्न) शैक्षणिक वर्ष 2022 – 23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि इयत्ता पहिलीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.
संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक प्रशस्त इमारत उभारण्यात आली असून या ठिकाणी प्रशस्त खेळाचे मैदान, इन डोअर – आऊट डोअर गेम, ईलर्निंग, लायबॅरी, कॉम्प्युटर, सीसीटीव्ही, अग्नीशामक सुविधा, स्वच्छ पाणी पुरवठा, बस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
पुढील कालावधीत टप्प्या-टप्प्याने बारावीपर्यंतचे वर्ग वाढविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी पालकांनी श्रध्देय पब्लीक स्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क – 7272865555 / 7272875555