सायबर गुन््ह्याचा नवीन प्रकार; तुमचे कार्ड बंद होते अन् पैसे गायब !!
चौफेर न्यूज – इंदूरमध्ये सिम कार्ड स्वॉपिंगच्या माध्यमातुन सायबर गुन्हेगारांनी एका रूग्णालयाच्या मालकाला 20 लाख रूपयांना गंडविल्याचे उघडकीला आले आहे. गुन्हेगारांनी रूग्णालय मालकाचे (तन्नू अग्रवाल) माबाईल सिम कार्ड दोन वेळा बंद केले. ते पूर्ववत सुरू करण्याच्या नावाखाली ओटीपी शेअर करायला लावून दोन दिवसांत त्यांच्या खात्यातून ही रक्कम काढून घेतली.
12 ते 14 डिसेंबरदरम्यान एकूण दहावेळा ही रक्कम काढण्यात आली. स्मार्टफोनच्या माध्यमातून सिम क्लोनिंग वा सिम स्वॉपिंग केले जाते. सिम स्वॉपिंग म्हणजे सिमची अदलाबदली करून घेणे वा त्याच नंबरचे दुसरे सिम मिळविणे होय. तुमच्याच मोबाईलवरून नव्या सिमची नोंदणी केली जाते. नंतर तुमचे सिम बंद होते. नेटवर्कगायव होते. गुन्हेगाराकडे तुमच्या नंबरचे सिम चालू असते. तो या नंबरवरून ओटीपी मागवतो आणि तुमच्या
खात्यातील रक्कम लांबवतो. फोन कॉलसाठी तो शनिवार वा पुढे दोन-तीन दिवस सुट्ट्या आहेत, असा दिवस निवडतो. तो ई-मेल आयडी देतो आणि एक लिंक पाठवतो. सिम पूर्ववत चालू करण्यासाठीच्या क्यूआर कोडसाठी लिंकवरील अर्ज भरायला सांगतो. कंपनीचा क्यूआर कोडगुन्हेगाराकडे असलेल्या मोबाईलवर येतो आणि तो या कोडला स्कॅन करतो. इकडे तुमचे सिम बंदच असते. त्यामुळे या काळात झालेल्या व्यवहाराची कुठलीही माहिती तुम्हाला मिळत नाही.
स्वताःला वाचवावे कसे ?
अनोळखी नंबरवरून फोन आल्यास त्याला कुठलीही वैयक्तिक माहिती देऊ नये. समस्या उद्भवल्यास थेट संबंधित मोबाईल नेटवर्क कंपनीच्या कार्यालयात स्वताः जावे. अन्य कुणी सांगितलेल्या ई-मेल आयडीचा वापर करू नये.