चौफेर न्यूज – प्रचिती पब्लिक स्कुल, पिंपळनेर येथे नाताळ सण उत्सहात साजरा करण्यात आला.
ख्रिसमस का ये प्यारा त्यौहार
जिवन में लाये खुशिया अपार
सांता क्लॉज आये आपके व्दार
शुभकामनाये हमारी करे स्विकार
आजच्या या कार्यक्रमात शाळेचे समन्वयक राहूल पाटील सर मुख्याध्यापीका अनिता पाटील मॅम उपस्थीत होत्या. कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी रेखाटण्यात आली. तसेच आकर्षक फलक लेखन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना देसले यांनी केले. ख्रिसमस विषयी आधिक माहिती किरण देवरे यांनी दिली. शाळेची 5 वीतील विद्यार्थ्यांनी श्रावणी शेवाळे हिने ख्रिसमसचे गाणे सादर केले. अनिता पाटील यांनी मुलांना नाताळ विषयी गोष्ट सांगीतली. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थीनींनी सुंदर असा डांस सादर केला. सांताक्लॉज च्या आगमनाने विद्यार्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सांताच्या हस्ते केक कटींग करून विद्यार्थ्यांना केक व चॉकलेट वाटण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने सरिता अहिरे यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.