चौफेर न्यूज – आज दि.3/1/2022 रोजी प्रचिती पब्लिक स्कूल,पिंपळनेर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
“सावित्री आईची थोर पुण्याई
त्यामुळेच शिकल्या माझ्या
आई, ताई आणि बाई “
आजच्या या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर,मुख्याध्यपिका अनिता पाटील मॅम उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण देवरे मॅम यांनी केले.
” सावित्रीबाई फुले जयंती “विषयी अधिक माहित सरिता अहिरे मम् यांनी दिली. सावित्रीबाई फुले जयंती विषयी माहिती शाळेतील विद्यार्थी श्रावणी शेवाळे, विभूती सोनवणे, लावण्या अहिरे, देवयानी शेवाळे, निलेश शेवाळे ,सानवी नलवडे, जान्हवी घरटे, अनुष्का अहिरराव इत्यादींनी दिली.
शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम यांनी सावित्रीबाई फुले जयंती विषयी माहित सांगितली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केले गेली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.