चौफेर न्यूज – राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन -: प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी मॅम,सौ.वैशाली लाडे मॅम व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर, श्री.तुषार देवरे सर, श्री. गौतम वाघ सर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच इयत्ता दुसरी तील निहारिका बोरसे हिने राजमाता जिजाऊ चा वेश परिधान करून” मी राजमाता जिजाऊ बोलते” अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्या वर जर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही व आमचा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड येथे झाला. सिंदखेडचे लखुजी जाधव आमचे वडील, राणी म्हाळसाबाई यांच्या पोटी कन्यारत्न म्हणून जन्मास आलो. जगदेव काकांशी तलवारबाजी करत असताना रणचंडिका असा उल्लेख आमचे आबासाहेब नेहमीच करायचे. सैन्याची वर्दळ,शौर्याच्या गाथा, राज्यकारभाराचा न्यायनिवाडा पाहतच आम्ही वाढलो. आम्ही सातशे मुलींची फौज जमा केली . स्वतःच्या रक्षणा बरोबर इतरांचेही रक्षण केले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. तर शाळेच्या अध्यापिका कविता सूर्यवंशी यांनी माता जिजाऊंचे जीवन हा संस्काराचा खजिना होय.मातृत्व, नेतृत्व व कर्तुत्व या तीन गुणांचा संगम म्हणजे जिजाऊ होय.माता जिजाऊंनी स्वराज्याचे भव्य स्वप्न पाहिले होते.आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांनी शिवरायांवर बालपणापासून उत्तम संस्कार केले. प्रत्येक मावळ्यात स्वाभिमान निर्माण केला व प्रत्येक मावळ्यात शिवबा घडविला असे मनोगत व्यक्त केले.तर शाळेचे शिक्षक धर्मराज अहिरे सरांनी स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला असून त्यांनी योग, राजयोग,ज्ञानयोग असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला. स्वामी विवेकानंद एक तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहास या विषयाचे विद्वान होते. स्वामी विवेकानंदांनी अध्यात्मिक,धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टी द्वारे सर्व मानव जातीला जीवन जगण्याची पद्धती शिकवली ते नेहमी कर्मावर विश्वास ठेवणारे महान पुरुष होते. ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्न करत राहा असा संदेश त्यांनी सर्वांना दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पाटील मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.