मंत्र वक्रतुंमहाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा
चौफेर न्यूज – चौदा विद्या 64 कला यांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती उत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी गणपतीला उकडीचे मोदक व तिळाचे लाडू यांचा नैवेद्य दाखविला जातो.
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्री गणेश जयंती निमित्त श्री .सुरज पाटील व स्नेहा पाटील यांच्या हस्ते गणपती पूजा व हवन करण्यात आला ..याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले..सर्व विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद लुटला.