चौफेर न्यूज – दिनांक 19/2/2022 रोजी प्रचीती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय चेरमन प्रशांत पाटील साहेब, संमनव्यक राहुल पाटील सर मुख्यद्यापिका अनिता पाटील मॅम उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालनं अनुष्का धामणे मॅडम यांनी केले . ज्या मंगलमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला आधार उजाडली शिव दिनाही पहाट……. सूंदर असे रांगोळी रेखाटन ज्योती खैरनार मॅडम यांनी केले. शिव जयंती विषयी अधिक माहिती किरण देवरे मॅडम यांनी केले. शिव जयंती विषयी माहिती शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी दिली. काही विद्यार्थ्यांनी पोवाडा,गीत डान्स अप्रतिम सादर केला. कार्यक्रमाची सांगता सुनीता जाधव मॅडम आणि केली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सुरची भोजनांने झाली.