चौफेर न्यूज – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे जिल्हा वार्षीक आदिवासी उपयोजना अंतर्गत दोन दिवसीय आश्रमीय क्रीडा स्पर्धा शासकीय आश्रम शाळा रोहड येथे दिमाखात साजऱ्या झाल्या.या क्रीडा स्पर्धा मा.प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. दिनांक 18 व 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील चारही तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेत शिक्षण घेणारे सुमारे 1200 खेळाडू विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. या स्पर्धेत विविध सांघिक व वैयक्तीक खेळांचा समावेश होता.विशेष म्हणजे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून या वर्षी प्रथमतः बुद्धिबळ व कॅरम या इनडोअर सांघिक खेळांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे दि.18 रोजीच्या स्पर्धा उदघाटन प्रसंगी राईनपाडा आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत सादर केली तसेच म्हसदी,रोहड,पिंपळनेर व कुसुम्बा आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी नंदी नृत्य,लेझीम,झान्झ पथक सादर केले .स्पर्धा संपल्यावर संध्याकाळी विद्यार्थ्यांच्या कालागुणांना वाव मिळण्यासाठी सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला.या कार्यक्रमात शासकीय व अनुदानीत आश्रम शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांनी एकूण 33 कार्यक्रम सादर केले,ज्याद्वारे आदिवासी संस्कृती व देशभक्ती उत्तम कला,संगीत,नाटिका,नृत्य, द्वारे सादर केली. या कार्यक्रमात इंदवे आश्रम शाळा प्रथम, द्वितीय रोहड व शिरसोले आश्रम शाळा तसेच तृतीय पिंपळनेर आश्रम शाळा तसेच शासकीय आश्रमशाळा राईनपाडा व सुकापूर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
कोरोना नंतर च्या तणाव ग्रस्त वातावरण ओसरल्यानंतर राज्यात प्रथमच एवढ्या बहुसंख्येने क्रीडा स्पर्धांचे आयोजन यशस्वी झाले. या स्पर्धेचे उदघाटन आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते झाले.उदघाटन कार्यक्रमास आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदिप गोलाईत अध्यक्ष स्थानी होते. साक्री पंचायत समिती सभापती श्रीमती प्रतिभा सुर्यवंशी, रोहड चे सरपंच हिम्मत साबळे रमेश वसावे प्रकल्पस्तरीय नियोजन समिती अध्यक्ष तसेच प्रकल्पस्तरीय सदस्य श्री.धीरज अहिरे,अत्तरसिंग पावरा, दीपक अहिरे,लताबाई पवार,ऍड.मनुवेल वळवी, प्रविण बापू चौरे,व माजी खासदार बापू चौरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खैरनार, प्रतिभा देशमुख चौरे,ज्योती पाटील,भारती बोरसे,सह वीरांगना महिला सदस्य ,प्रा.योगेश सोनवणे, प्रा.अविनाश पाटील,श्री. कृष्ण सोनवणे आदींनी केले.एव्हरेस्ट कन्या कु.चंद्रकला गावित उद्घाटन समारंभाला उपस्थित होती.दोन दिवसासाठी “चंद्रकला गावित क्रीडा नगरी”असे मैदानाचे नामकरण करण्यात आले होते.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत धावणे,लांब उडी, उंच उडी,थाळीफेक, गोळाफेक,भालाफेक, या वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा, तसेच व्हॉलीबॉल, खो – खो, कॅरम,बुद्धिबळ, कब्बडी,हँडबॉल,रिले,या सांघिक क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या विविध क्रीडा प्रकारात खेळाडू विद्यार्थ्यांनी आपले क्रीडा कौशल्य दाखवून प्रथम, द्वितीय,व तृतीय क्रमांकाचे पदक पटकाविले. दि.19 रोजी अप्पर तहसीलदार श्री.विनायक थविल , सहाययक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) नवनाथ जानगर,सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) पी.के.ठाकरे, विजय भडगावकर, बी.ए. आव्हाड, रोहड आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संजय वाघ, विस्तार अधीकारी अविनाश पाटील, सी.बी.साळुंखे,एम.पी.जाधव,
सचिन चौधरी,आर.जे.पाटील,श्रीमती जयश्री देवरे,श्रीमती लता मोरे भांडार शाखेचे नितीन पाटील, सतीश काकड ,पंचायत समिती सभापती प्रतिभाताई सूर्यवंशी, सरपंच हिम्मत साबळे आदींच्या शुभहस्ते पदक व पारितोषिक बहाल करण्यात आले. त्याप्रसंगी अप्पर तहसीलदार थविल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा व स्वतःच्या गुणवत्ता वाडीसाठी कोणते प्रयत्न करावेत,स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतः च्या पायावर कसे उभे रहावे हे पटवून दिले. जीवनात अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही हे समजावले.
सदर स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकारात साक्री तालुक्यातील मुले व मुली एकूण 31 प्रथम बक्षीस,द्वितीय एकूण 31 बक्षीस,तसेच तृतीय एकूण 31 बक्षिसे वाटप झाली. शिरपूर शिंदखेडा व धुळे तालुक्यातील मुले व मुली यांना प्रथम 24, द्वितीय 31, तृतीय 26 बक्षिसे प्रदान करण्यात आले. सांघिक खेळात कब्बडी या खेळात मुले 14 वयोगट शिरपूर तालुका अनेरड्याम विजेता, व उपविजेता नांद्रे आश्रमशाळा, मुली 14 वयोगट रेवाडी आश्रम शाळा विजेता व राईनपाडा आश्रम शाळा उपविजेता,17 वयोगट मुले रोहड आश्रमशाळा विजेता व सुकापूर आश्रमशाळा उपविजेता, 17 वयोगट मुली शिरपूर आश्रमशाळा विजेता व धुळे शिंदखेडा,19 वयोगट मुले शेवगे व सामोडे,उपविजेता नवापाडा,19 वयोगट मुली बोपखेल विजेता व रोहड आश्रम शाळा उपविजेता. खो खो या खेळात 14 या वयोगटातील मुले शिरपूर वाघाडी विजेता व अक्कलकोस उपविजेता,14 वयोगट मुली म्हसदी आश्रमशाळा विजेता व शिरपूर उपविजेता ठरले. 17 वयोगट मुले शिरपूर विजेता तर कुसुम्बा उपविजेता, 17 वयोगट मुली रेवाडी विजेता तर म्हसदी उपविजेता,19 वयोगट मुले रोहड विजेता तर समोडे उपविजेता,19 वयोगट मुली कुसुम्बा विजेता तर उमरपाटा उपविजेता ठरले. नेहमी प्रमाणे व्हॉलीबॉल खेळाची पंढरी समजली जाणारी आमळी आश्रम शाळेच्या टीम ने आपले वर्चस्व कायम ठेवत 14 वयोगटातील मुले विजेता तर शिरपूर वाघाडी आश्रम शाळा उपविजेता ठरली.14 वयोगट मुली विजेता तर उमर्दा आश्रमशाळा उपविजेता राहिली. 17 वयोगटातील मुले राईनपाडा आश्रम शाळा विजेता तर उमरपाटा उपविजेता,17 मुली आमळी आश्रम शाळा विजेता तर वाघाडी आश्रम शाळा उपविजेता राहिली. 19 मुले रोहड विजेता तर शेवगे उपविजेता,19 मुली शिरसोले विजेता तर कुसुम्बा उपविजेता राहिले. हँडबॉल या सांघिक क्रीडा प्रकारात 14 वयोगट मुले जैताने विजेता तर वारसा उपविजेता,14 मुली शिरसोले विजेता तर लौकि आश्रम शाळा उपविजेता,17 वयोगट मुले जैताने विजेता तर उमर्दा उपविजेता,17 वयोगट मुली इंदवे आश्रम शाळा विजेता तर शेवगे उपविजेता ठरली.19 वर्ष वयोगटातील मुले इंदवे विजेता तर शेवगे उपविजेता, व मुली शिरसोले विजेता तर उमरपाटा उपविजेता राहिले. रिले खेळात 4 × 100 मीटर मध्ये 14 वयोगटातील मुले शिरपूर चोपडाझीन विजयी तर इंदवे उपविजेता, मुली शिरसोले विजेता तर म्हसदी उपविजेता ठरले. 17 वयोगट मुले नीमझरी विजेता तर चिपली पाडा उपविजेता व मुली शिरसोले विजेता तर वारसा उपविजेता ठरले. 19 वयोगट मुले इंदवे विजेता तर रेवाडी उपविजेता, मुली शिरसोले विजेता तर निमझरी उपविजेता राहिले.4×400 मिटर अंतरासाठी 19 वयोगटातील मुले इंदवे विजेते तर शेवगे उपविजेता, मुली इंदवे विजेता तर म्हसदी उपविजेता राहिले.
या वर्षी प्रथमच बुद्धिबळ खेळाचा सांघिक खेळात समावेश करण्यात आला त्यात संदीप पावरा शिरपूर आर सी पटेल 14 वयोगटातील विजेता तर सागर बागुल राईनपाडा उपविजेता राहिला.17 वयोगट मुले शिरपूर रोहिणी विजेता तर कुसुम्बा उपविजेता, मुली शिरपूर रोहिणी विजेता तर राईनपडा उपविजेता,19 वयोगट मुले शेवगे विजेता तर कुसुम्बा उपविजेता, मुली शेवगे विजेता तर शिरसोले उपविजेता ठरले. कॅरम खेळात 14 वयोगट मुले व मुली राईनपाडा विजयी झाले.17 वयोगट मुले शिरपूर व मुली राईनपाडा विजेता, तर 19 वयोगटातील मुले शिरपूर वाघाडी तर मुली शिरपूर निमझरी विजेता राहिले.
या स्पर्धांमध्ये सर्व विजयी उपविजयी खेळाडूंचे मा प्रकल्प अधिकारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यालयीन कर्मचारी,प्रकल्पस्तरीय शासकीय व अनुदानीत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,क्रीडासमन्वयक विजय खैरनार,यजमान रोहड चे मुख्याध्यापक संजय वाघ सह शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , शासकीय व अनुदानीत चे सर्व क्रीडा शिक्षक व सर्व क्रीडा समिती सदस्यांनी मेहनत व परीश्रम घेतले. प्रसिद्धी प्रमुख आमळी आश्रम शाळेचे माध्यमिक शिक्षक प्रविण साळवे व किरण ठाकरे यांचे सहकार्य लाभले.