चौफेर न्यूज – आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस व जनरल नॉलेज कवीज् काँपिटीशन साजरी करण्यात आली.
विज्ञान मानवता के लिए एक
खुबसुरत तोहफा है, इसका हमें
सदूपयोग करना चाहिए
राष्ट्रीय विज्ञान दिवस हा रमन प्रभाव शोध म्हणून साजरा करण्यात येतो या शोधाची घोषणा सर शंकर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केली.
आजच्या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक श्री.राहूल पाटील सर व प्राचार्य श्रीमती पाटील मॅम उपस्थित होते. श्री.राहूल पाटील सर यांच्या हस्ते सी.व्ही.रमण यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काजल मॅम यांनी केले. सुंदर असे फलक लेखन अनुष्का मॅम यांनी केले.
आजच्या या विज्ञान दिनानिमित्त सायंन्स विषयावर आधारित जनरल नॉलेज क्वीझ काँपिटीशन आयोजित करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांनी क्वीझ काँपिटीशन मध्ये भाग घेऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी छानसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
विज्ञान दिनानिमित्त काजल मॅम यांनी विज्ञान दिवसाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रोजक्टस् बनवले व त्याविषयी माहिती दिली कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वेळेवर हजर होते.