चौफेर न्यूज – प्रचिती पब्लिक स्कुल, पिंपळनेर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. मुस्कुराकर दर्द भुलाकर
रिश्तो मे बंद थी दुनिया सारी
हर पल को रोशन करने वाली
वो शक्ती है एक नारी
जागतिक महिला दिन कार्यक्रम निमित्त आज प्रचिती पब्लिक स्कुल, पिंपळनेर येथे सर्व महिला शिक्षक व विद्यार्थींनीचा सन््मान करण्यात आला.
आज कार्यक्रमासाठी शाळेचे समनवयक श्री. राहूल पाटिल सरांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व शिक्षिका वृंदाचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पुजन, सावित्रीबाई पुजन जिजामाता पुजनाने झाली.
आजच्या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्थांनी महिला दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या व स्त्रीयांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थांनी आपल्या नृत्याव्दारे दाखवले तसेच शाळेच्या शिक्षिका सरीता खैरनार यांनी आपल्या भाषणातुन मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात विविध खेळ स्पर्धा आयोजित करून सर्व शिक्षक वृदांना आनंदीत केले.
कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्यांनी सौ.अनिता पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. किरन देवरे मॅडम यांनी केले.
खेळाचे आयोजन सौ.सुनीता जाधव, सौ.रिनल सोनवणे, सौ.आर्चना देसले यांनी केले.
महिला दिनाची सुंदर अशी रोगोळी अनुष्का धामणे व काजल राजपुत यांनी काढली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन सौ.अर्चना देसले मॅडम यांनी आपल्या भाषणातुन केले.