चौफेर न्यूज – गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे वृत्त आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल उद्या (बुधवार, ८ जून) घोषित केला जाणार आहे. उद्या दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर केला जाणार आहे. www.mahahscboard.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा विकाल पाहता येणार आहे. परीक्षेचा सीट नंबर (रोल नंबर) आणि आईचे नाव निकाल पाहण्यासाठी आवश्यक आहे.
प्रतिक्षा संपली! इयत्ता बारावीचा निकाल उद्या लागणार; जाणून घ्या सर्व माहिती
