CBSE ने इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे प्रवेशपत्र जारी केले आहे. सर्व शाळांना ऑनलाइन प्रवेशपत्रे पाठवण्यात आली आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आला आहे. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्रे डाऊनलोड केल्यानंतर, ती उमेदवारांना दिली जातील. प्रवेश पत्रावर शाळेच्या मुख्याध्यापकांची डिजिटल स्वाक्षरी असेल. यात परीक्षेशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वेही असतील. 15 फेब्रुवारीपासून 10 वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. https://www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html
https://www.cbse.gov.in/cbsenew/documents//20230207_downloadingof_Admit_Card_class_X_and_XII_2023_07022023.pdf
सीबीएसईने परीक्षांचे नमुना पेपरही प्रसिद्ध केले आहेत. याशिवाय प्रश्न बँक आणि CBSE 10वी, 12वी वर्ग मार्किंग स्कीम देखील जारी करण्यात आली आहे. cbseacademic.nic.in वर भेट देऊन, विद्यार्थी त्यांच्या मदतीने परीक्षेची तयारी करू शकतात. प्रवेशपत्रात दिलेली जसे विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख इ. माहिती बरोबर आहे की नाही हे विद्यार्थ्यांना तपासावे लागणार आहे.