चौफेर न्यूज – आज दि. 17/2/23 रोजी प्रचिती स्कुल पिंपळनेर येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
राजे असंख्य झाले आजवर या जगती
पण शिवबासमान मात्र कुणी न झाला
गर्व असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवबा झाला
“जय भवानी जय शिवाजी”
आजच्या या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर व मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम उपस्थित होत्या
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर सर्व शाळेतील विदयार्थ्यान समवेत जल्लोषात शोभा- यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रे दरम्यान विदयार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने “जय भवानी जय शिवाजी ” ”हर हर महादेव” अशा विविध घोषणा दिल्या. तदनंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिनल सोनवणे मॅडमांनी केले. कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांबददल माहिती व भाषणे दिली काही विदयार्थ्यांनी शिवस्तुती, शिवगर्जना व पोवाडे यांचे सादरीकरण केले. तसेच इयत्ता चौथी व पाचवीच्या विदयार्थ्यांनी सामूहिक नृत्य प्रस्तुत केले. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी विविध विदयार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे सुंदर असे चित्र रेखाटन करून आणले होते. आजच्या कार्यक्रमासाठी सुंदर असे फलकलेखन व रांगोळी साकारण्यात आली होती. कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थी शिवाजी महाराज तसेच जिजाऊच्या वेशभुषेत हेजर होते.
कार्यक्रमाच्या सरतेशेवटी सुनिता जाधव मॅडमनी आभार प्रदर्शन केले. तसेच जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणांनी कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.