भारतीय टपाल विभागात मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा आणि मणिपूरसाठी ग्रामीण टपाल सेवक (GDS) (शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा टपाल मास्टर (ABPM)/टपाल सेवक) या पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
India Post GDS Recruitment 2023: भारतीय टपाल विभागात मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा आणि मणिपूरसाठी भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरू करण्यात येत आहे. अधिकृत माहितीनुसार, 16 जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी उमेदवार 23 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार indiapostgdsonline.gov.in वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात. संस्थेतील 12,828 पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.
India Post GDS Recruitment 2023: वयोमर्यादा
भारतीय टपाल विभाग भरती 2023 साठी वयोमर्यादा उमेदवाराचे १८-४० वर्षांपर्यत असले पाहिजे. सरकारी नियमांनुसार SC/ST/OBC उमेदवारांसाठी वयात सवलत दिली जाईल.
India Post GDS Recruitment 2023: अर्ज फी
भारतीय टपाल विभागाच्या या भरतीसाठी अर्ज शुल्क 100 रूपये आहे. पण, सर्व महिला अर्जदार, SC/ST अर्जदार, PWD अर्जदार आणि ट्रान्सवुमन अर्जदारांना फी भरण्यासाठी सूट आहे.
India Post GDS Recruitment 2023 – https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Model_Notification.pdf
India Post GDS Recruitment 2023 अंतिम मुदतीमध्ये वाढ – https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Addendum.pdf
शाखेनुसार पोस्ट अधिसूचना – https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Final_Post_Consolidation.pdf
अर्ज कसा करावा
- सर्व प्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जावे
- त्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करा आणि नंतर अर्ज भरा
- माहिती भरा आणि अर्ज शुल्क भरा
- अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्ज जमा करा
- उमेदवारांच्या अर्जाची प्रत प्रिंट करून ठेवा