चौफेर न्यूज – आज दि. 03-07-2025 रोजी प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे ” गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
गुरूशिवाय ज्ञान नाही
ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म
सर्वकाही गुरुचीच देन आहे.
माझ्या सर्व गुरुना खुप खुप धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या.
आजच्या या कार्यक्रमात शाळेचे समन्वयक राहुल पाटिल सर आणि मुख्खाध्यापिका आनिता पाटिल मॅम उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले आणि कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी रेखाटण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल मॅम यांने केले. “गुरुपौर्णिमा ” विषयी माहिती सुनिता जाधव मॅम यांनी दिली व गुरुपौर्णिमे निमित्त सुंदर असे गीत रिनल मॅम यांनी गायले. गुरुपौर्णिमे विषयी माहिती विदयार्थी व विद्यार्थीनींनी सांगितली.
शाळेचे समन्वयक राहुल पाटिल सर यांनी गुरुपौर्णिमा विषयी माहिती सांगितली. इयत्ता ६वी व ७वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनी गुरुशिष्य हे नाटक सादर केले. शाळेतील विद्यार्थीनी शिक्षकाप्रती आदरभाव व्यक्त करून सर्व शिक्षकांना कुमकुम तिलक करून वंदन केले.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केली गेली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपास्थित होते.