चौफेरन्यूज – दि. 15-8-23 रोजी प्रचिती पब्लिक पिंपळनेर येथे स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.
आज़ादी की कभी शाम ना होने देंगे!
शहीदों की कुर्बानी बदनाम ना होने देंगे,
बची है लहू की, एक बूँद भी, रगो में
तब तक भारत माता को आँचल
नीलाम ना होने देंगे।
भारताचा 77 वा स्वातंत्र दिन प्रचिती पब्लिक स्कुल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. देशभर सर्वत्र ‘ मेरी मिट्टी मेरा देश ‘ हे अभियान राबविण्यात येत आहे.. या अभियानाचा उद्देश असा की, शहिद जवानांच्या स्मृतिला उजाळा देऊन मानवंदना देणे व मातीचे पुजन करणे.
आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून साक्रीचे श्री. गिरीधर गुलाबराव पवार
(रिटायर मिलिट्री ऑफिसर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच ध्वजगीत व राष्ट्रगीत गायन करून, घोषवाक्य देऊन वातावरण उत्साहित करण्यात आले. श्री. गिरीधर सर मराठा रेजीमेंट मध्ये आर्मी नं. 2799184 H प्राप्त करून सन 2000-2017 पर्यंत कार्यरत होते.
आजच्या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक श्री. राहुल अहिरे सर उपस्थित होते. त्यांनी स्वातंत्र दिनाबद्दल माहिती सांगुन विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मॅम उपस्थित होत्या व त्यांनी देखील भाषण देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषण व देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. तसेच विद्याथ्यांनी विविध स्वातंत्र सैनिकांच्या भूमिका साकारल्या होत्या. आजच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या विदयार्थ्यांनी तिरंगा रंगातील ध्वज, ग्रीटींग कार्ड, फुले विविध प्रकारचे चित्र बनवली.
आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना देसले यांनी केले तसेच स्वातंत्रदिना विषयी अधिक माहिती काजल राजपुत यांनी दिली. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलकलेखन करण्यात आले व सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने आश्विनी पगार यांनी केली. कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.