पिंपरी | लायन्स क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि भोसरी लायन्स क्बल, चिंचवड रॉयल लायन्स क्लब यांच्या वतीने चिंचवड येथील मोरया मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात डायलेसिस युनिट सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत लायन्स क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशनचे माजी संचालक नरेंद्र भंडारी यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमासाठी लायन बी. एल. जोशी, लायन शामकुमार माने, लायन सीमा पारेख, लायन शैलजा सांगळे, लायन आनंद मुथा, लायन शैलेश आपटे, लायन उपेंद्र खंबेटे, लायन निलेश टिळक, लायन सरस सिन्हा, लायन असित सिन्हा, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, दिलीप सोनिगरा आदी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, मोरया मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे हे कार्य समाजातील गरजू लोकांना जीवदान देणारे आहे. हा एक इतिहास असून यामध्ये अशीच एकेक पाने जोडली जावीत. आमदार जगताप यांनी मोरया रुग्णालय आणि लायन्स क्लबला शुभेच्छा दिल्या.