Chaupher News
दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाने आज (बुधवारी) सुधारित मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक २०२० ला मंजुरी दिली. त्यामुळे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी कायदा, १९७१ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. हे नवे विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे. याद्वारे महिलांना यापूर्वी गर्भपातासाठी असलेली २० आठवड्यांची मर्यादा वाढवत २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे देशातील माता मृत्यूदर कमी होण्यासही मदत होणार आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, “२० आठवड्यांत गर्भपात केल्यानंतर आईच्या जीवाला धोका निर्माण होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे २४व्या आठवड्यात गर्भपात करणे महिलांसाठी सुरक्षित राहिल. त्यामुळे गर्भपातासाठी २४ आठवड्यांपर्यंत मुदत वाढवण्यात आल्याने बलात्कार पीडित महिला आणि अल्पवयीन मुलींना यामुळे मोठा दिलासा मिळेल.