Chaupher News
अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी सरकारकडून निधी घेतला जाणार नाही, जनतेच्या योगदानातून मंदिराची निर्मिती होणार असल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट) चे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितलं आहे. याचबरोबर सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना भव्य राम मंदिराच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी अयोध्येत बोलवले जाणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
महंत नृत्य गोपाल दास म्हणाले, आम्ही अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलं आहे, आमच्याबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या नात्याने योगी आदित्यनाथ देखील आहेत. याशिवाय आम्ही धार्मिक कार्यात रस असणाऱ्या इतर राज्याच्या मुख्यमंत्री व राज्यपालांनाही मंदिराच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी बोलवणार आहोत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना देखील बोलवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.