चौफेर न्यूज – इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विषयनिहाय शंका समाधान कार्यक्रमाचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. आपण याविषयीचे वेळापत्रक https://maa.ac.in/index.php?tcf=counselling या संकेतस्थळावर पाहू शकता. या कार्यक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहनदेखील वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. याचसोबत मराठा आरक्षणामुळे इयत्ता 11 वी साठीची प्रवेशप्रक्रिया सद्यस्थितीमध्ये स्थगित करण्यात आली आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये इयत्ता 11 वी च्या उच्च माध्यमिक शाळा / महाविद्यालये सुरु होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन (युट्युब लाइव्ह) च्या माध्यमातून निशुल्क स्वरूपामध्ये तासिका / वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी सदरच्या लिंकवर आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे