चौफेर न्यूज – दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) सीएच्या अंतिम, इंटरमिडिएट परीक्षांची तारीख बुधवारी जाहीर केली. 5 जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. सीए अंतिम आणि इंटरमिडिएटच्या जुन्या व नव्या अभ्यासक्रमांचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहेत. पोस्ट क्वालिफिकेशन कोर्सेसमधील (पीक्यूसी) इन्शुरन्स अॅण्ड रिस्क मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट ही परीक्षाही 5 जुलैपासून घेण्यात येणार आहे. त्याचे सविस्तर वेळापत्रक आयसीएआयकडून लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मे महिन्यात 21 आणि 22 तारखेला या परीक्षा घेतल्या जाणार होत्या, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या.