चौफेर न्यूज – गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो.या दिवसाला तीलकुंड चतुर्थी असेही म्हटले जाते.शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेने सहस्र पटीने कार्यरत असते असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे, या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखविला जातो. गणेश जयंती शब्दशः गणेशाचा वाढदिवस ज्याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात.याप्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्म साजरा केला जातो. याचे औचित्य साधून प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये श्री. प्रमोद पंडित खैरनार व सौ मनीषा प्रमोद खैरनार यांच्या हस्ते होम यज्ञ व पूजा करण्यात आली. याप्रसंगी गणेशास तिळाचे लाडू व प्रसादाचा नैवेद्य दाखविण्यात आला. याप्रसंगी शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भीमराव पाटील सर, प्राचार्या सौ .भारती पंजाबी मॅम, सौ. वैशाली लाडे मॅम व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर , श्री. तुषार देवरे सर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व विद्यार्थी वर्गाने, शिक्षक वर्गाने ,कर्मचारीवर्गाने प्रसादाचा व भोजनाचा आस्वाद घेतला.