चौफेर न्यूज –
पिंपळनेर :- येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
“बलिदानों का सपना जब सच हुआ,
देश तभी आजाद हुआ.
आज सलाम करे उन वीरों का
उनकी शहादत से ये भारत गणतंत्र हुआ”
या ओळींचा सन्मान राखत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाईट इनफ्रेंटी रेजिमेंट तुकडीत 18 वर्षे देशसेवेचे कार्य बजावलेले माजी सैनिक रविंद्र ठोके यांना देण्यात आला होता. त्यांनी जम्मू काश्मिर, आसाम, दक्षिण आफ्रिका येथे कार्य केले आहे. यावेळी, शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील उपस्थित होत्या. शिक्षकांनी केलेले सुंदर असे फलक लेखन व सुंदर अशा रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले. ध्वजारोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे समन्वयक राहुल पाटील यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या शिक्षिका अर्चना देसले, किरण देवरे, काजल राजपूत यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही भाषणे, नृत्य व कवितांचे सादरीकरण केले. काही विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेत आले होते.
कार्यक्रमाची सांगता माधुरी शिंदे यांचे आभार प्रदर्शनाने झाली.