श्रद्धेय पब्लिक स्कूलमध्ये देशभक्तीपर गीते, नृत्य सादरीकरणाद्वारे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
चौफेर न्यूज – पुणे, दि 26 जानेवारी 2023: शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये देश भक्तीची भावना रुजविण्यात यावी, असे प्रतिपादन माजी सैनिक अजित बालवडकर यांनी केले. श्रद्धेय पब्लिक स्कूल बालेवाडी, पुणे येथे विविध देशभक्तीपर गीते, नृत्य सादरीकरणाद्वारे 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
क्रीडा शिक्षक गौरव कुमार, माजी सैनिक अजित बालवडकर यांच्या हस्ते ध्वजारोहन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रसंगी, विद्यार्थ्यांची परेड काढण्यात आली. तसेच, देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्रध्देय पब्लिक स्कूलच्या शिक्षिका अल्का हाके, पूनम तांदळे यांनी पुष्पगुच्छ देवून केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, नृत्य सादरीकरण कार्यक्रमाने रंगत आली. अल्का हाके, मोहिनी हुकरे या शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम गीताने झाला. तसेच, विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम तांदळे, अपूर्वा जगदाळे यांनी केले. प्रजासत्ताक दिन कार्यक्रम यशस्वीतेसाठी अल्का हाके, पूनम तांदळे, मोहिनी हुकरे, रुपाली पाटील, धनश्री घाडगे, केया चॅटर्जी, अंजली कुमारी, अपूर्वा जगदाळे, उमेश इथापे, दिव्या दिक्षित, चैताली बेंगळे, सिद्धेश नाईक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.