चौफेर न्यूज – 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.भारती पंजाबी मॅम सौ. वैशाली लाडे मॅम,व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे सर,श्री.तुषार देवरे सर यांच्या हस्ते ज्ञानाची देवता सरस्वती माता व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी नेहा पाटील व नम्रता भदाणे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन परिचय देताना सांगितले की सह्याद्रीच्या कुशीतून,एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा, शिवनेरी प्रकटला, हातात घेऊन तलवार, शत्रू वर गरजला,महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. शिवाजी महाराज कुशल प्रशासक चतुर योद्धा,पराक्रमी,वीर योद्धा, दयाळू शासक होते. त्यांच्या सेनेत मुस्लिम नायक व सेनापती होते. ते कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हते. स्त्रियांचे ते कट्टर समर्थक होते असे सांगितले.याप्रसंगी इयत्ता आठवीची विद्यार्थिनी पूर्वा पवार हिने शिवाजी महाराजांबद्दल माहिती देताना सांगितले की 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत,हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणारे, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी 16 30 या मंगलदिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका शूर सिंहाचा जन्म झाला.त्यांनी त्यांनी जलदुर्ग बांधले.शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी माहिती विशद केली. सातवीचा विद्यार्थी प्रणव ठाकरे याने अफजलखानाचा वध शिवाजी महाराजांनी कसा केला याविषयी माहिती विशद केली.सहावी ची विद्यार्थिनी दूर्वा देवरे हिने छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाचा अर्थ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त ते मुघलांना करणारे, परत न फिरणारे,तीनही जगात जाणणारे,शिस्तप्रिय, वाणिज्य तेज,जिजाऊंचे, महाराष्ट्राची शान,हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक,जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे सांगितले.निशांत पाटील (आठवी ) (आठवी )हार्दिक माळीस कर (सहावी )भार्गवी ठाकरे (सहावी) निहारिका बोरसे (तिसरी )पहेल नांद्रे (पाचवी) या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या सामाजिक, धार्मिक,राजकीय कार्याविषयी माहिती विशद केली. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन करण्यात आले.या कार्यक्रमाचे संयोजन कोमल बागले मॅम यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.