पिंपरी :- मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर यांनी सालाबाद प्रमाणे श्रीमंत छञपती शिवाजी महाराजांची भव्य शिवजयंती उत्सव पिंपरी शगुन चौक येथे उत्साहात साजरी केली.
यावेळी छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास चिंचवड विधानसभेचे नेते राहुलदादा कलाटे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना चिंचवड महिला संघटिका अनिताताई तुतारे, वैभवीताई घोडके, यास्मिन शेख, पुनम रिटे, हनुमंत पिसाळ, सचिन लिमकर, आधिकराव भोसले, मारुती म्हस्के, गणेश पाडुळे, प्रदिप दळवी, रविकिरण घटकार, भरत इंगळे, अंकुश पवार, दिपक भक्त, काका कुलकर्णी, नरसिंग माने, शंकर शिंगारे, बबलु कदम, शिवाजी कुर्हाळकर, अरुण पाञे, अनिल पालांडे, आकाश दरवणकर उपस्थित होते.