सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी-चिचंवड शहर आयोजित रामनवमी उत्सव २०२३ गणेशनगर थेरगाव डांगे चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वाराणसी येथील पुजारी आमंत्रित करून प्रसिध्द गंगा आरती च्या धरतीवरती श्री रामनवमी निमित्त प्रभु रामचंद्रची महाआरती करण्यात आली यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते तसेच थेरगाव परीसरातील नागरीक ही मोठ्या संख्येने या महाआरतीस उपस्थित होते..
आरती झाल्यानंतर विद्यार्थी सेने तर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन चिखले,अंकुश तापकीर मयुर चिंचवडे,राजेश अवसरे,अनिता पांचाळ या उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनिकेत प्रभु तसेच शहर उपाध्यक्ष सिध्देश सोनकवडे,विकास कदम,ओंकार पाटोळे,सचिव अक्षय नाळे वि अध्यक्ष सुमित कलापुरे मयुर हजारे अक्षय खामकर शंतनु तेलंग यश कुदळे,संदेश सोनावने, स्वप्निल मंडल,श्रीकांत धावारे,आकाश खैरे,अमोल शिंदे,शुभम लांडगे यांनी केले.