चौफेर न्यूज – सन 2022 23 नॅशनल स्तरावर झालेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत प्रचिती शाळेतील चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेच्या निकाल नुकताच जाहीर झाला असून सर्व विद्यार्थ्यांना चमकदार कामगिरी केल्याबद्दल स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे संस्थापक माननीय प्रशांत भीमराव पाटील साहेब शाळेचे प्राचार्य वैशाली लाडे समन्वयक वैभव सोनवणे सर, तुषार देवरे सर तसेच शाळेचे कलाशिक्षक भूपेंद्र साळुंके सर, वैष्णवी थोरात मॅडम यांनी केले. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.