पिंपरी :– पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पाय जॅम फाऊंडेशन पुणे यांनी संयुक्त्पणे महानगरपालिकेतील शाळांतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कॉम्प्युटर सायन्सचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, यासाठीचा आज सामंजस्य करार केला. या अंतर्गत महापालिकेतील 8 मॉडेल शाळांमध्ये सुसज्ज अशी पायलॅब उभारली जाणार असून महानगरपालिका शिक्षकांचे सक्षमीकरणही करण्यात येणार आहे.
सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभावेळी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांनी सांगितले की, “नवीन शैक्षणीक धोरण 2020 नुसार कॉम्पूटेशनल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉलविंग आणि क्रिटिकल थिंकिंग यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास व्हावा, हे समाविष्ट आहेत. याशिवाय शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक डिजीटल साधनांची मदत घेवून अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये डिजिटल सर्जनशीलता आणि डिजाइन थिंकिंग कौशल्ये विकसीत करणे गरजेचे आहे. सदर गरज लक्षात घेता २१ व्या शतकातील कौशल्ये विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आंगिभुत व्हावीत, यासाठी पाय जॅम फाऊंडेशनच्या कॉम्पुटर सायन्स क्षेत्रातील तज्ञ व कुशलतेचे सहाय्य नक्कीच महानगरपालिकेला होईल, या विश्वासाने सामंजस्य करार करीत आहोत.”
सामंजस्य करार अंतर्गत एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट ही स्थापन केले जाणार आहे. त्याचे उददेश्य हे महानगरपालिका शाळांत अस्तिवात असलेली डिजिटल सामग्री विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अधिकाधिक प्रभावीपणे कशी वापरली जावी, यासाठी प्रयत्नशील असेल. पाय लॅब स्थापना, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आणि PMU यांचा समावेश असल्याने सदर प्रकल्प हा डिजिटल शिक्षणाचे परिसंस्था मॉडेल साकारण्याची क्षमता असलेले आहे, असे मत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केले. स्वाक्षरीवेळी महानगपालिका सहाय्यक आयुक्त विजय थोरात, पाय जॅमचे संस्थापक शोएब दार आणि प्रकल्प व्यवस्थापक शुभम बडगूजर आदी उपस्थित होते.






















