चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये 21 एप्रिल 2023 रोजी सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅम श्री.तुषार देवरे सर श्री. वैभव सोनवणे सर प्रमुख अतिथी श्री .कपिल पंजाबी सर, श्री. केतन काकुस्ते सर, सौ. पूजा पंजाबी मॅम, सौ.भाग्यश्री नांद्रे मॅम यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ. वैशाली लाडे मॅम, व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे सर,तुषार देवरे देवरे सर व शिक्षकांच्या हस्ते श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला.याप्रसंगी सौ. सुनीता पाटील मॅडम यांनी ग्रॅज्युएशन डे बद्दल माहिती देताना सांगितले की सिनियर केजी च्या वर्गात पाच वर्षाचे विद्यार्थी असतात या वयातील विद्यार्थ्यांना खेळण्याची आवड असते.परंतु खेळाबरोबरच अभ्यास देखील तितकाच महत्त्वाचा असतो.म्हणून पाया भक्कम असेल तर सुंदर घर उभे राहतं तसेच सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी नर्सरी ते सीनियर केजी पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले. याबद्दल त्यांना गौरविण्यात येते.सौ. हिरल सोनवणे मॅम यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी हिरल मॅम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिसके अंदर है सच्चा पण, दिल के अंदर है अपनापन, जिस के बिना अधुरा है जीवन, हा प्रकृती सबसे प्यारा तोफा है, बचपन आओ इस बचपन को निखारे इनकी ताकत पहचानो, भरदे सारे रंग इनके व्यक्तित्व मे चलो, कामयाबी की निव रचाये विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या अभ्यासाविषयी,खेळाविषयी, वेगवेगळ्या उपक्रमाविषयी आपला सहभाग कसा दर्शविला. वर्षभरात मुलांनी केलेल्या प्रगतीचा आढावा देत मुलांना चांगले भविष्य घडविण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी केतन काकुस्ते सर,पूजा पंजाबी मॅम धनंजय नांद्रे सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून प्रचिती मधील शिक्षकांचे गुणगौरव कर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध कला गुणांनी कसे परिपूर्ण केले व आमच्या पाल्यांना शिक्षित केले व आभार मानले.याप्रसंगी सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी जिनके पाव धरती पर नही बादल पे है या गाण्यावर नृत्य प्रदर्शन केले. यासाठी सायली मॅम गीतांजली मॅम,पुनम यांनी मार्गदर्शन केले. युकेजी च्या सर्व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे मॅम यांनी केजीच्या विद्यार्थ्यांना भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन हिरण सोनवणे मॅडम यांनी केले.