चौफेर न्यूज – दि 29 एप्रिल, 2023. शनिवार, श्रध्देय पब्लिक स्कूल बालेवाडी मध्ये श्रध्देय पब्लिक स्कूल येथे दि. 17 एप्रिल 2023 ते 29 एप्रिल, 2023 या दोन आठवड्याचा समर कॅम्प आयोजीत करण्यात आला.
यामध्ये संस्कार वर्ग, चित्रकला,कार्यानुभव, झुंबा, योगा, नृत्य, कथा कथन, मैदानी खेळ, पारंपारीक खेळ इ. प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले. आज कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी मुलांना अल्पोपहार देण्यात आला.
14 दिवसीय समर कॅम्प यशस्वी पार पाडव्यासाठी अल्का हाके, पूनम तांदळे, मोहिनी हुकरे, रुपाली पाटील, केया चॅटर्जी, अपूर्वा जगदाळे, रोहिणी कुराडे, अंजली कुमारी, चैताली बेंगळे, रुपाली हांडे, उमेश इथापे, सिध्देश नाईक, गौरव कुमार आदि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.