पिंपरी :– पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत अश्या सूचना माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शत्रुघ्न काटे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत सोमवारी प्रभागाची पाहणी केली. पावसाळा सुरू झाल्याने आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
यावेळी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विलास देसले, उपअभियंता सुनिल नरोटे, कनिष्ठ अभियंता प्राजक्ता गव्हाणे, ड्रेनेज विभाग कनिष्ठ अभियंता भाग्यश्री ढोले आणि इतर पालिका अधिकारी व काँट्रॅक्टर्स उपस्थित होते. स्वराज चौक येथील “श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर” या मंदिराकडे जाणारा रस्ता खूप वाईट अवस्थेत आहे आणि पावसामुळे रस्ता रहदारीसाठी आणखीन कठिण झाला आहे. यामुळे सदर रस्ता रहदारीसाठी तात्पुरत्या स्वरूपात ग्राऊटींग आणि रोलिंग करून देण्याबाबतच्या सूचना शत्रुघ्न काटे यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत.
त्यानंतर कॅस्टेलिया सोसायटी ते स्वराज चौक दरम्यान प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. पावसामुळे याठिकाणी खूप पाणी साचत असल्याने नागरिकांना वाहतूक करण्यात फार अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून शत्रुघ्न काटे यांनी पालिका अधिकारी सोबत पाहणी केली आणि सदर रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत लवकरात लवकर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात यावी अशी सूचना दिल्या आहेत.
कोकणे चौक येथील थोपटे लॉन्सकडे जाणाऱ्या १२ मी. रस्ता (द्वारका सन क्रिस्ट फेज १, २ आणि ३ या सोसायटी समोरील रस्ता) काँक्रीटीकरणाचे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला आणि सदर रस्त्याच्या कामाबद्दल असलेल्या विविध अडचणी बाबतीत पालिका अधिकारी सोबत सविस्तर चर्चा केली असून लवकरात लवकर या रस्त्याचे काँक्रीटीकरण काम पुर्ण करावे अश्या सूचना दिल्या आहेत.