चौफेर न्यूज – आज दि. 28-06-2023 रोजी प्रचिती प्रब्लिक स्कूल, पिंपळनेरचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम उंभर्टी येथे साजरी करण्यात आली.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटेवरी ठेवुनिया ।।
तुलसी हार गळा कासे पीतांबर
आवडे निरंतर तेचि रूप ।।
आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे आषाढी शुद्ध एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा गजर करत प्रचिती पब्लिक स्कुल चे सर्व विदयार्थी शिक्षक व भजनी मंडळी समवेत वारी दिंडी काढण्यात आली. सर्व विद्यार्थी उत्साहपूर्ण सहभाग घेऊन विठ्ठल रुक्मीनीची पालखी घेऊन उंभर्टी गावातून मंदिरापर्यंत नेण्यात आली. तसेच विठ्ठलाच्या नामाचा गजर करत त्याच्या चेहयावर प्रसन्न भाव दिसून आला दरवर्षीप्रमाणे ही वारी उत्साहाने साजरी करण्यात आली. वारीसाठी भजनी मंडळ उपस्थित होते. त्यांनी सुंदर भजने प्रस्तुत केली. तसेच त्याच्या भजनाच्या तालावर विद्यार्थीनीनी व शिक्षकवृंदाने ताल धरला. शाळेचे विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी व वारकरी नववार साडी परिधान करून तुळशी वृंदावन डोक्यावर धरून या रूपात सुंदर दिसत होते. विठ्ठलाची आकर्षक अशी रांगोळी रिनल आणि सुनिता मॅडम यांनी रेखाटली. सुंदर असे फलकलेखन करून त्यामध्ये विठोबाची प्रतीकृत आश्विनी पगार व धनथी मॅडम यांनी रेखाटली.
आषाढी एकादशी कार्यक्रमानिमित्त शाळेचे चेअरमन श्री प्रशांत पाटिल सर यांनी योग्य मार्गदर्शन करून कार्यक्रम कसा उठावदार होईल यासाठी योग्य मार्गदर्शन केले
आषाढी एकादशी कार्यक्रमानिमित्त शाळेचे समन्वयक श्री. राहुल पाटिल सर व मुख्याध्यापिका अनिता पाटिल – यांचे योग्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिक्षा कोतकर यांनी केले. आषाढी एकादशी निमित्त चे महत्त्व किरन देवरे यांनी सांगितले. शाळेच्या विद्यार्थिनीनी सुंदर नृत्य सादर केले. भक्तीगीत व अभंग गाउन वातावरण प्रसन्न केले.
अशा रितीने कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. प्रसाद खाऊन सर्व मुलांच्या चेहयावर प्रसन्नता दिसून आली. कार्यक्रमाची सांगता भोजनाने झाली.