साक्रीतील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये क्रीडा दिवस
साक्री : साक्री येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त रांगोळीत खेळांचे चित्र रेखाटण्यात आले होते. फलक लेखनातून विद्यार्थ्यांना खेळाविषयीचा संदेश दिला होता. शाब्दिक खेळासह मैदानी खेळांच्या स्पर्धा या वेळी घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या खेळांमध्ये सहभाग घेत स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्कूलचे अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील प्रमुख पाहुणे होते. धनंजय लक्ष्मण सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. परेड संचलन करून विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित केले व सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाला सुरूवात झाली. खेळाविषयीचे महत्व वृषाली सोनवणे यांनी पटवून दिले. धनंजय सोनवणे यांनी शाब्दिक खेळ घेऊन विद्यार्थ्यांना उत्साहित केले. शारीरिक दृष्ट्या सदृढ व आनंदीत राहण्यासाठी खेळ आवश्यक असतात, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना खेळायला प्रवृत्त करण्यासाठी क्रीडा साहित्य वापरून ‘चक दे इंडिया’ या गाण्यावर आरूषी देवरे, आर्या सोनवणे, नक्षत्रा भामरे, उर्वा चंद्राले. हर्दीका मालीचकर, दूर्वा देवरे, चंद्रकांत सोनवणे, निल तोरवणे, अर्णा सोनवणे, तनिष्का देवरे, लावण्या बोरसे यांनी नृत्य सादर केले.
कार्यक्रमाच्या उद्धाघटनासाठी तिरंगा रंगाच्या टोप्या घालून आलेल्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना क्रीडांगणावर आमंत्रित केले व पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
खेळांमध्ये लिंबू चमचा, बादलीत चेंडू टाकणे, बेडूक उडी, धावण्याच्या स्पर्धा, बुक बॅलेन्स, बटाटे उचलणे, दोरी उडी, लंगडी असे अनेक खेळ घेण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य भारती पंजाबी, संयोजक वैभव सोनवणे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका वैशाली लाडे, भारती पवार, पुनम पवार, हर्षदा पाटील, वृषाली सोनवणे, सुनिता पाटील, प्रिती लाडे, प्रतिभा भदाणे, जयश्री नांद्रे, बंदिश खैरनार व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. वैशाली लाडे यांनी सूत्रसंचालन केले.