तालुकास्तरीय योगा स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा डंका; 14 व 17 वर्ष वयोगटातील 10 मुला – मुलींची जिल्हास्तरीय योग स्पर्धेसाठी निवड
साक्री : तालुकास्तरीय शालेय पावसाळी योग क्रीडा स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूल च्या मुला – मुलींनी उत्कृष्ठ कामगिरी करत आपल्या योग कलेचा डंका वाजवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे.
राज्य शासन व केंद्र शासन मार्फत दरवर्षी शालेयस्तरावर पावसाळी विविध क्रीडा- स्पर्धांचे तालुकास्तर जिल्हास्तर विभागस्तर, राज्य व राष्ट्रीयस्तरांवर आयोजन करण्यात येते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यावर दहा खेळ घेतले जातात. त्याअनुषंगाने तालुकास्तरीय योग स्पर्धेचे आयोजन आदर्श माध्यमिक विद्यालय जैताणे निजामपूर या शाळेत करण्यात आले होते.
यामध्ये, तालुक्यातील विविध शाळांमधून 14 वर्षे वयोगट मुले- मुली, 17 वर्षे वयोगट मुले- मुली, 19 वर्ष वयोगट मुले -मुली अशा एकूण 84 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री येथील 15 विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी आपली योगकलेतील नाविन्यपूर्वक कला दाखवत विविध उत्कृष्ट योग आसणे सादर केली. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे 15 पैकी 10 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास आदर्श माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक, तालुक्यातील विविध क्रीडा शिक्षक, साक्री तालुका क्रीडा संकुलचे सदस्य, तालुका संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
विजयी स्पर्धकांचे प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांनी अभिनंदन करून विशेष कौतुक केले. शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शालेय क्रीडा स्पर्धा 2023 – 24 योगा स्पर्धेतील विजयी स्पर्धक
14 वर्षे वयोगट –
1) हिंदवी कांकरिया (मुली)
2) आर्यन पाटील (मुले)
3) मयूर ठाकरे (मुले)
4) रोहित अहिरे (मुले)
17 वर्षे वयोगट –
1) भाग्यश्री चोरडिया (मुली)
2) समता कांकरिया (मुली)
3) यथार्थ पाटील (मुले)
4) मधुर शेवाळे (मुले)
5) दिव्यम पाटील (मुले)
6) ध्रुव देवरे (मुले)